जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची एमआयडीसीला भेट उद्योग कंपन्यांची पाहणी
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची एमआयडीसीला भेट
उद्योग कंपन्यांची पाहणी
वाशीम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वाशिम येथील एमआयडीसी औद्योगिक परिसराला भेट देऊन विविध उद्योग कंपन्यांची दि.३ नोव्हेंबर रोजी पाहणी केली. त्यांनी या पाहणी दरम्यान उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला तसेच औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि सुरक्षेची स्थिती याबाबत सविस्तर माहिती घेतली.
जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, औद्योगिक क्षेत्रातील विकास गतीमान करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल. तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष अंगद राऊत, उपाध्यक्ष संदीप धोटे, सचिव कृष्णा चौधरी तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घूले, कृषी उपसंचालक हिना शेख, एमआयडीसी अकोलाचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठळे, उप रचनाकार स्नेहा नंद, उपअभियंता
धीरज नगराळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योग क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन देत एमआयडीसी परिसराच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी श्री .कुंभेजकर यांनी आज वाशिम एमआयडीसी परिसरातील जी.एम. इंडिया सेरेमिक, जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, पवन ऍग्रो इंडस्ट्रीज आदी उद्योग कंपन्यांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची पाहणी केली. या भेटीदरम्यान उद्योगांच्या उत्पादन प्रक्रिया, कामगारांची स्थिती, सुरक्षेची उपाययोजना तसेच
जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला.
0 Response to "जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची एमआयडीसीला भेट उद्योग कंपन्यांची पाहणी"
Post a Comment