
वाशिम पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीसाठी १३ ऑक्टोबरला बैठक
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीसाठी १३ ऑक्टोबरला बैठक
वाशिम,दि.९ ऑक्टोबर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. रानिआ/निपपंस-२०२५/प्र.क्र.३०/का.७, दि. १ ऑक्टोबर २०२५ अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता पंचायत समिती वाशिम निर्वाचक गणासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गांकरिता आरक्षण सोडत (प्रवर्गनिहाय महिला आरक्षण आणि सर्वसाधारण महिला आरक्षणसह) दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात येणार आहे.
ही सोडत नवीन सभागृह, तहसिल कार्यालय, वाशिम येथे पार पडणार असून सर्व संबंधित नागरिकांना या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिल कार्यालय, वाशिम यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Response to "वाशिम पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीसाठी १३ ऑक्टोबरला बैठक"
Post a Comment