-->

जनसामान्याचा प्रसादचंद्रमा - राष्ट्रपिता महात्मा गांधी व माझी दैदिप्यमान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात संयुक्त जयंती साजरी......

जनसामान्याचा प्रसादचंद्रमा - राष्ट्रपिता महात्मा गांधी व माझी दैदिप्यमान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात संयुक्त जयंती साजरी......

 



साप्ताहिक सागर आदित्य 

जनसामान्याचा प्रसादचंद्रमा - राष्ट्रपिता महात्मा गांधी व माझी दैदिप्यमान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात संयुक्त जयंती साजरी...... 

रिसोड तालुक्यातील मुलींचे भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 2 ऑक्टोबर रोजी भारताचे दुसरे दैदिप्यमान माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व जनसामान्याचा प्रसादचंद्रमा राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. प्रथमतः भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय मंजुषा सु. देशमुख मॅडम व पर्यवेक्षक सन्माननीय सुनिल डाहाळके सर  या मान्यवराच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कु. किरण कैलास पवार या विद्यार्थिनींनी  गायलेल्या   "स्वागत करते  है दिलसे' या सुमधुर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर महापुरुषाच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे अनेक विद्यार्थिनींनी केली. या नंतर आदरणीय पर्यवेक्षक सुनील डहाळके सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की महात्मा गांधी यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी कशी होती. 1917, 1920 1920,1930,1942 हा सत्याग्रही संग्राम आणि गाजलेले वर्ष इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहले गेले. शेवटी अध्यक्षीय समारोपातून  आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना 1893 ते 1914  जो दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी 21 वर्ष संघर्ष केला व भारतीयांना न्याय मिळवून दिला हा दाखला देत गांधीजींचे कार्य आजही आजरामर कशे आहे. हा आपल्या मनोगत आतून दाखला दिला . तसेच भारताचे दुसरे दैदिप्यमान  पंतप्रधान लालबहादुर शास्त्री एवढ्या उच्चपदस्थ असून सुद्धा साधा एक कोट आणि राहायला घर सुद्धा नाही. पंतप्रधान असताना सुद्धा भाड्याच्या घरात राहत असेल.आणि राशनच्या तांदळावर आपला उदरनिर्वाह करत. अशी साधी जीवनशैली असलेले लाल बहादूर शास्त्री 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी "जय जवान जय किसान' ही घोषणा दिली. एक शेतकऱ्याचे  कैवारी म्हणून  आजही त्यांचा नावलौकिक आहे. प्रत्येक राजकारणी यांनी लालबहादूर शास्त्री यांचा आदर्श घ्यावा असे सुचक विधान आपल्या अध्यक्षीय  समारोपातून केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साधना बोरकर मॅडम व आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका मंगला शेटे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांची  उपस्थिती लाभली.

0 Response to "जनसामान्याचा प्रसादचंद्रमा - राष्ट्रपिता महात्मा गांधी व माझी दैदिप्यमान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात संयुक्त जयंती साजरी...... "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article