
शेलगाव राजगुरे अंगणवाडी क्र.2 येथे राष्ट्रीय पोषण माह सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न.
साप्ताहिक सागर आदित्य
शेलगाव राजगुरे अंगणवाडी क्र.2 येथे राष्ट्रीय पोषण माह सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न.
रिसोड तालुक्यातील शेलगाव राजगुरे अंगणवाडी क्र.2 मध्ये 17 सप्टेंबर पासून ते 16 ऑक्टोबर पर्यंत चालणारा 8 वा राष्ट्रीय पोषण माह सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यामध्ये सगळ्यांच लक्ष वेधून घेणारी कडधान्याची आकर्षक अशी बाहुली काढण्यात आली. तसेच सुंदर अशी बेटी बचाओ बेटी पढाओ ची रांगोळी काढण्यात आली व त्याभोवती विविध पौष्टिक आहार प्रात्यक्षिक ठेवण्यात आली. पोषण थाली , आणि भविष्याचे झाड प्रदर्शन ठेवण्यात आले. त्यावेळी अंगणवाडी सेविका सौ. मायावती संजय भालेराव यांनी आहार प्रात्यक्षिककाचे महत्त्व सांगितले तसेच प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, लेक लाडकी योजना याबद्दल जनजागृती केली. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका सौ. मायावती संजय भालेराव, मदतनीस सौ. प्रगती वैभव कनकुटे, गावचे सरपंच पंजाब सोनुने, देविदास सोनुने, प्रकाश सोनुने, अरविंद सोनुने, आत्माराम खिल्लारे,सुनिल भालेराव, राजरतन भालेराव, उत्तम झगडे, रमेराव वाघ, अरुणाबाई खिल्लारे, किरणताई सोनुने, भावना वाकळे, आश्विनी वाकळे, कौशल्याबाई भालेराव, जयश्री खिल्लारे, गरोदरमाता तसेच स्तनदामाता, किशोरवयीन मुली इत्यादी उपस्थित होत्या.
0 Response to "शेलगाव राजगुरे अंगणवाडी क्र.2 येथे राष्ट्रीय पोषण माह सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न. "
Post a Comment