
जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५ ५२ पदांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर
साप्ताहिक सागर आदित्य
जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५
५२ पदांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली
आरक्षण सोडत जाहीर
वाशिम,दि.१३ ऑक्टोबर जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५ एकुण 52 जि.प. गटासाठी आरक्षण सोडत आज दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी जि.प.निवडणूक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.निवडणूक राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाशिम जि.प.गटासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांनी मान्यता दिलेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जाती एकूण 11 जागा सर्वसाधारण 5, महिला 6, अनुसूचित जमाती एकूण 4 जागा सर्वसाधारण 2, महिला 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 14 जागा सर्वसाधारण 7 महिला 7, सर्वसाधारण एकूण 23 जागा सर्वसाधारण 12, महिला 11 अश्या एकूण 52 जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली.
लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातीसाठी 17 पारवा, 35 गोवर्धन, 29 ब्राम्हणवाडा , 48 आडोळी, 49 तोंडगाव, 50 उकळीपेन,36 रिठद, 37 डोंगर किन्ही, 2 भामदेवी, 22 कंझरा हे 11 गट आरक्षित होते. यामध्ये सर्वसाधारण ५ आणि महिला ६ जागेचा समावेश आहे. महिला आरक्षणात १७ पारवा , २९ ब्राह्मण वाडा, ३१ डोंगर किन्ही, ३६ रिठद, ३५ गोवर्धन, ०२ भामदेवी गट आरक्षण चिठ्ठ्याद्वारे सोडत काढण्यात आली.
लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जमातीसाठी 26 किन्ही राजा, 25 राजुरा, 14 शेंदुरजना , 30 मेडशी हे 4 गट आरक्षित होते. त्यापैकी २५ राजुरा, १४ शेंदुरजना, महिला आरक्षण २६ किन्हीराजा, ३० मेडशी चिठ्ठ्याद्वारे सोडतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
अनुसूचित जाती व जमाती आरक्षित गट वगळून उर्वरित 37 जि.प.गटासाठी १ धनज बु, ३ मनभा , ४ उंबर्डा बाजार, ५ कामरगाव, ६ काजळेश्वर , ७ पोहा,८ धामणी, ९ इंझोरी, १० कुपटा, १२ आसोला खूर्द, १३ गिरोली,१५ फुलउमरी ,१६ पोहरादेवी, मंगरूळपीर तालुक्यातील १८ कवठळ, १९ दाभा , २० तराळा, २१ शेलू खूर्द, २३ कासोळा, २४ आसेगाव, मालेगाव तालुक्यातील २७ जऊळका रेल्वे,२८ पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील ३४ केनवड, ३८ हराळ, ३९ गोभणी, ४० वाकद, ४१ भर जहाँगीर,४२ चिचंबा भर, वाशिम तालुक्यातील ४३ काटा, ४४ पाथर्डी टकमोर, ४५ वारा जहाँगीर , ४६ कळंबा महाली, ४७ तामसी, ,५१ अनसिंग, ५२ वारला या गटातील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.यामधून १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण चिठ्ठ्याद्वारे निश्चित करण्यात आले.यामधे १८ कवठळ, ७ पोहा, २० तरहाळा, २४ आसेगाव, ६ काजळेश्वर, २७ जऊळका, १३ गिरोली,१ धनज बु, ३९ गोभणी,३३ तिवळी, २३ कासोळा, ४३ काटा ,३ मनभा, १० कुपटा आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यापैकी ७ नामाप्र महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये १ धनज बु , १० कुपटा, १८ कवठळ,६ काजळेश्वर, २४ आसेगाव, ३३ तिवळी, २३ कासोळा सोडतीव्दारे आरक्षण निश्चित करण्यात आले.
सर्वसाधारण गटासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव गट वगळून उर्वरित 23 गट सर्वसाधारण निश्चित करण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण 12 गटात 4 उंबर्डा बाजार , 5 कामरगाव, 8 धामणी, 11 तळप बु, 15 फुलउमरी,19 दाभा, 32 शिरपूर ,34 केनवड ,40 वाकद, 41 भरजहॉंगीर,45 वारा जहाँगीर, 46 कळंबामहाली, व महिला सर्वसाधारण आरक्षणासाठी 11 गटांसाठी 9 इंझोरी, 12 आसोला खुर्द, 16 पोहरादेवी , 21 शेलू खुर्द, 28 पांगरी नवघरे, 38 हराळ, 42 चिचंबाभर, 44 पार्डी टकमोर , 47 तामसी, 51 अनसिंग, 52 वारला या गटाचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी,पत्रकार, नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५ ५२ पदांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर"
Post a Comment