दिवाळी महोत्सवात 31 लाखावर विक्री ‘उमेद’च्या बचत गटांच्या स्टॉलला वाशिमकरांचा प्रतिसाद
साप्ताहिक सागर आदित्य
दिवाळी महोत्सवात 31 लाखावर विक्री
‘उमेद’च्या बचत गटांच्या स्टॉलला वाशिमकरांचा प्रतिसाद
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा अंतर्गत उमेद अभियानाच्या महिला बचत गटांनी लावलेल्या दिवाळी महोत्सव स्टॉल मधुन अवघ्या आठ दिवसात रु. 31 लक्ष 68 हजार एवढी विक्री झाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
दिवाळीपुर्वी 15 ते 23 ऑक्टोबर दरम्यान मुख्यालयासह इतर पाच पंचायत समिती मध्ये दिवाळी महोत्सवांतर्गत एकुण 6 विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी वाशिम येथील क्रिडा मैदानात उमेद अभियानाच्या वस्तू विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन केले होते. जिल्ह्यातील अधिकारी- कर्मचारी व नागरिकांनी सदर स्टॉलला भेट देऊन दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ, दिव्यांची व इतर शोभेच्या वस्तूंची खरेदी करावी आणि बचत गटातील महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही सीईओ चौहान यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला वाशिमकरांनी चांगलीच दाद दिली असुन 6 विक्री प्रदर्शनी स्टॉल्स मधुन तब्बल 31 लाख 68 हजार रुपयांची विक्री झाली आहे यातून अभियानातील बचत गट सदस्यांचे उत्पन्नही वाढले व प्रोत्साहन देखील मिळाले. उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
टेबल:
दिवाळी महोत्सव विक्री
तालुका विक्री (लाखात)
कारंजा 5.46
मालेगाव 5.50
मंगरूळपीर 4.17
मानोरा 1.12
रिसोड 2.98
वाशिम 12.45
------------------------------
एकूण विक्री 31.68 लक्ष
0 Response to "दिवाळी महोत्सवात 31 लाखावर विक्री ‘उमेद’च्या बचत गटांच्या स्टॉलला वाशिमकरांचा प्रतिसाद "
Post a Comment