-->

भा. मा. कन्या शाळेची विद्यार्थिनी कृष्णाजी प्रकाश घोडके राज्यस्तरीय

भा. मा. कन्या शाळेची विद्यार्थिनी कृष्णाजी प्रकाश घोडके राज्यस्तरीय



साप्ताहिक सागर आदित्य 

 भा. मा. कन्या शाळेची विद्यार्थिनी कृष्णाजी प्रकाश घोडके राज्यस्तरीय 

श्रीमद् भागवत गीता ज्ञान स्पर्धा परीक्षेत तृतीय पुरस्काराने सन्मानित....                       स्थानिक : रिसोड तालुक्यातील नेहमीच विद्यार्थिनींना वेगवेगळ्या कलागुणांना वाव देणारे  एकमेव मुलीचे भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड च्या विद्यार्थिनींचा पुन्हा एकदा राज्यस्तरावर सन्मान. मागील आठवड्यात राज्यस्तरीय श्रीमद् भागवत गीता ज्ञान स्पर्धा परीक्षाचे संपूर्ण महाराष्ट्रभर या परीक्षेचे आयोजन अखिल भारतीय श्रीकृष्ण प्रबोधन परिषद बुलढाणा द्वारा केले असता. महाराष्ट्रातून एकूण 25000 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले होते. तसेच वाशिम जिल्ह्यातून 2350 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ही परीक्षा लेखी स्वरूपाची असून श्रीमद् भागवत गीतेवर आधारित होती.त्यामध्ये भारत माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी कृष्णाली प्रशांत खोडके हिने या परीक्षेत महाराष्ट्रात तृतीय क्रमांक व वाशिम जिल्ह्यातून प्रथम क्रमांक  पटकावून पुन्हा एकदा भारत माध्यमिक कन्या शाळेचे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध केले आहे. तिचा गुणगौरव 28 ऑगस्ट रोजी श्री लोणारकर बाबा आश्रम अजिंठा रोड  बुलढाणा येथे महंत श्री. लोणारकर बाबा महानुभाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब माजी आरोग्य मंत्री, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे असून या  हस्ते कृष्णाली खोडके हिला सन्मानचिन्ह,  प्रमाणपत्र आणि रोख रक्कम रुपये 701 देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या सन्माननीय मंजुषा सु. देशमुख मॅडम, व  संस्कृत विषयाचे मार्गदर्शक शिक्षक वसंत बुंधे ( शास्त्री ) सर यांना सुद्धा सन्मानचिन्ह आणि शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले. कृष्णाली खोडके हिच्या यशाबद्दल तिचे कौतुक   प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम, पर्यवेक्षक  सुनील डहाळके सर  सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग यांच्यासह  विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

0 Response to "भा. मा. कन्या शाळेची विद्यार्थिनी कृष्णाजी प्रकाश घोडके राज्यस्तरीय"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article