श्री.शिवाजी हायस्कूल व इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गोभणी च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड
साप्ताहिक सागर आदित्य
श्री.शिवाजी हायस्कूल व इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गोभणी च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल व इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गोभणी गावच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे 18 व 19 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता आठवी ते बारावी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी धावणे व रिले स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. सांघिक रिले स्पर्धेमध्ये 17 वर्ष वयोगटातील चेतन पंजाब साबळे, ऋषिकेश अशोक पद्मने, रोशन विष्णू हुले, मयूर तेजराव दांदडे, शेख दानिश शेख मुख्तार या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत चेतन पंजाब साबळे या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.17 वर्ष वयोगटातून 300 मीटर मुलींमधून जिल्ह्यातून तृतीय आलेली कु. पूनम भाऊराव साबळे तसेच 4×100,4×400 या सांघिक रिले स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला विभागीय स्तरासाठी दोन्ही संघाची निवड झाली आहे. तरी या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सिद्धार्थ लेमाडे सर, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार अमित झनक साहेब, संस्थेचे सचिव बबनराव गारडे, शाळेचे मुख्याध्यापक गावंडे सर व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Response to "श्री.शिवाजी हायस्कूल व इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गोभणी च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड "
Post a Comment