भारत प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा
रिसोड : येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारत प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किरणताई दुबे यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव देशमुख , जयश्री दुबे उपस्थित होते. सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती तथा माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सौ किरणताई दुबे तथा सेवाज्येष्ठतेनुसार सत्कारमूर्ती शिक्षक विलास पावडे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका किरणताई दुबे म्हणाल्या की " शिक्षकांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे व्यक्तीच्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाताना आपल्याला शिक्षकांचा आधार असतो". याप्रसंगी सत्कारमूर्ती विलास पावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विद्यार्थ्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी समयोचित भाषणे केली. याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी जुमडे हिने केले तर आरुषी सिकवाल हिने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
0 Response to "भारत प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा "
Post a Comment