संत गाडगे महाराज विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य मोरे एमबीबीएस ला प्रवेश याबद्दल सत्कार!
साप्ताहिक सागर आदित्य
संत गाडगे महाराज विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य मोरे एमबीबीएस ला प्रवेश याबद्दल सत्कार!
रिसोड,
तालुक्यातील अगदी छोटे खेड असलेले मोठेगाव येथील संत गाडगे महाराज माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य देवानंद मोरे या विद्यार्थ्यांने नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तम गुण घेऊन घवघवीत यश प्राप्त केल्याने . त्याचा प्रवेश लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला लागला.
तो मार्च 2024 च्या इयत्ता 12 विज्ञान शाखेतून चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला असून . त्यांच्या या यशाबद्दल त्याचा सत्कार संत गाडगेबाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष दत्तरावजी धांडे तसेच प्राचार्य नागेशभाऊ धांडे ,प्रा. सुभाष साबळे, अँङ हिरामण मोरे, सतीश धांडे, शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन त्याचा यथोचित सत्कार केला . व त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या . लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस ला आदित्य मोरे याला प्रवेश मिळवल्याने त्याचे सर्वत्र स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.. ग्रामीण भागातून प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे.
0 Response to "संत गाडगे महाराज विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य मोरे एमबीबीएस ला प्रवेश याबद्दल सत्कार!"
Post a Comment