मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास सर्वांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
साप्ताहिक सागर आदित्य
मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास सर्वांनी सहकार्य करावे
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
महिला मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा मानस
वाशिम,दि.६ ऑगस्ट १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम मा. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात पात्र मतदारांनी सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, जिल्हा माहिती अधिकारी यासिरोद्दीन काझी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, आज दि. ६ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादीचे प्रकाशन आज करण्यात आले असून २० ऑगस्ट पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. दि. १० व ११ ऑगस्ट तसेच १७ व १८ ऑगस्ट या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून सदर दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
उपस्थित राहणार असून फॉर्म नं. ६.७ व ८ स्वीकारण्यात येणार आहे.
दि. २९ ऑगस्ट पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे, दि. ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादीचे प्रकाशन होणार आहे.
जिल्ह्यात एकुण ९ लक्ष ८५ हजार मतदार आहेत. यामध्ये पुरुष ५ लक्ष १३ हजार ५५३ व महिला ४ लक्ष ७२ हजार ९० मतदार आहेत. जिल्ह्यात एकुण १ हजार १०० मतदान केंद्र व १९ तृतीय पंथी मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिली.यावेळी पत्रकार उपस्थित होते.
0 Response to "मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास सर्वांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "
Post a Comment