मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : आदिवासी मुलींच्या वसतिगृहात दोन महिला उमेदवारांची निवड
साप्ताहिक सागर आदित्य
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना :
आदिवासी मुलींच्या वसतिगृहात दोन महिला उमेदवारांची निवड
वाशिम,दि.२ ऑगस्ट युवकांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शासकीय व निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध होणार असून वाशिम येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात दोन महिला उमेदवारांची निवड
करण्यात आली असून महसूल पंधरवडा निमित्त जिल्हाधिकारी श्रीमती. बुवनेश्वरी एस. यांचे
हस्ते आज २ ऑगस्ट रोजी २ महिला उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या महिला उमेदवारांचे अभिनंदन केले व त्यांना त्यांच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गजानन बिटोडे,आदिवासी वसतिगृहाच्या अधिक्षिका अपर्णा देशमुख, अनुराधा बिसणे उपस्थित होते.
या योजनेमुळे महिलांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासासाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अत्यंत प्रेरणादायी ठरेल. निवड झालेल्या उमेदवारांना विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ मिळेल. ज्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती साधता येईल. या योजनेंतर्गत १२ वी पास उमेदवारांना सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत सहा हजार, आयटीआय, पदविका उमेदवारास आठ हजार तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारास दहा हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त पात्र युवक - युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.
0 Response to "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : आदिवासी मुलींच्या वसतिगृहात दोन महिला उमेदवारांची निवड"
Post a Comment