-->

पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड तात्काळ काढून घ्यावे        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड तात्काळ काढून घ्यावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

 


साप्ताहिक सागर आदित्य 

पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड तात्काळ काढून घ्यावे

      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा

       

५ लक्ष रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार मोफत


लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


वाशिम  केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यात २३ सप्टेंबर २०१८ पासून राबविली जात आहे.या योजनेचा जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.

     २७ जुन रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा   जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

    यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, भारतीय वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.संतोष सारडा, जिल्हा समन्वयक डॉ.रणजित सरनाईक, जिल्हा प्रमुख वैभव टकले व अंगीकृत रुग्णालयांचे वैद्यकीय समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती.

           या योजनेमध्ये १ हजार ३५९ गंभीर आजारांवर ५ लक्ष रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकीय आणि खासगी रुग्णालयातून पूर्णतः मोफत केले जातात.हे आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब,प्रति वर्ष ५ लक्ष रुपये अशा स्वरूपात मिळत असते.  

            संपूर्ण राज्यामध्ये  "प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण १ हजार २४ रुग्णालये अंगीकृत आहेत.त्यापैकी २२६ शासकीय रुग्णालये असून ७९८ खासगी रुग्णालये अंगीकृत आहेत. 

         जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, वाशिम,उपजिल्हा रुग्णालय, कारंजा, ग्रामीण रुग्णालय,मंगरुळपीर,बालाजी बाल रुग्णालय,वाशिम,बिबेकर हॉस्पिटल,वाशिम.देवळे हॉस्पिटल, वाशिम,कानडे बाल रुग्णालय, वाशिम.लाईफ लाईन हॉस्पिटल, वाशिम.बाहेती हॉस्पिटल वाशिम,वोरा हॉस्पिटल,वाशिम,वाशीम क्रिटिकल केअर सेन्टर,वाशिम,गजानन बाल रुग्णालय हॉस्पिटल,वाशिम.श्री. गजानन बाल रुग्णालय,मालेगांव या रुग्णालयाचा समावेश आहे.

            आजपर्यंत या योजनेमधून ५२ हजार १२८ लाभार्थीना उपचार आणि शस्त्रक्रियाचा लाभ मिळाला असून  यावर १३० कोटी ६६ रुपये खर्च शासनाकडून करण्यात आला आहे. 

                १ सप्टेंबर २०२३ पासून "आयुष्मान भव " या मोहिमेअंतर्गत- आयुष्मान आपल्यादारी ३.० उपक्रम जिल्ह्याभरात राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सर्व पात्र लाभार्थीना त्यांचे आयुष्मान कार्ड्स शासनाकडून केवायसीद्वारे तयार करून दिले जात आहे.हे कार्ड तयार करण्याकरीता आशा सेविका,ग्रामपंचायत केंद्र चालक,सेतू सुविधा केंद्र,आरोग्य यंत्रणा आणि अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र लाभार्थीच्या आधार कार्डसच्या साहाय्याने आयुष्मान कार्ड तयार करून देत आहे.याकरिता राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण यांचेकडून एक मोबाईल अँप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. 

Web Portal: 

https://beneficiary.nha.gov.in, 

Mobile Application:

https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp 

                 या लिंकद्वारे अप्लिकेशन डाउनलोड करून लाभार्थी बेनेफिशरी पर्याय निवडून स्वतःचे कार्ड स्वतः तयार शकतात.जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेमध्ये सर्व ग्रामपंचायत,सर्व आरोग्य केंद्रे आणि शहरी भागात वॉर्डनिहाय कार्ड काढण्याचे शिबिरे आयोजित केली आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आतापर्यंत ११ लाख ५३ हजार  पात्र लाभार्थ्यांपैकी ४ लाख ९९ हजार २१२ लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड्स वितरीत करण्यात आले आहेत.

   यावेळी डॉ.कावरखे यांनी लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही.यासाठी रूग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजग असावे.असे निर्देश यावेळी  दिले.

                  प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्याकरिता आयुष्मान कार्ड आवश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थींनी आपले कार्ड त्वरित काढून घेणे गरजेचे आहे.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

0 Response to "पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड तात्काळ काढून घ्यावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article