लाभार्थ्यांनो ! बॅंक खात्याशी आधारकार्ड जोडुन घ्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
साप्ताहिक सागर आदित्य
लाभार्थ्यांनो ! बॅंक खात्याशी आधारकार्ड जोडुन घ्या
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
वाशिम, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व पात्र लाभार्थी यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने जर बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नसेल तर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करता येणार नसलेबाबत शासनाकडुन सुचित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार
योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान हे महाडीबीटी प्रणालीव्दारे वितरीत करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. त्यानुषंगाने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनेतील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आपला आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.
0 Response to "लाभार्थ्यांनो ! बॅंक खात्याशी आधारकार्ड जोडुन घ्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस"
Post a Comment