डॉक्टर दिनानिमीत्त वाशिम जिल्हयातील डॉक्टरांनी केले जिल्हा रुग्णालयात वृक्षरोपन
साप्ताहिक सागर आदित्य
डॉक्टर दिनानिमीत्त वाशिम जिल्हयातील डॉक्टरांनी केले जिल्हा रुग्णालयात वृक्षरोपन
१ जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हनुन साजरा केला जातो. आज डॉक्टर्स दिना निमीत्त वाशिम जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय येथील सर्व डॉक्टर्स यांनी जिल्हा रुग्णालय येथे वृक्षारोपन केले. आजच्या युगात सध्या प्रदुषनाची पातळी वाढत आहे. त्यामुळे वृक्षारोपन करणे काळाची गरज आहे. वाशिम जिल्हयातील डॉक्टर्स यांनी डॉक्टर्स दिनाच्या दिवशी वृक्षारोपन करुण अधिकाधिक झाले लावण्याचा संदेश दिला आहे. मानवाला जगण्यासाठी अधिकाधिक वृक्षारोपन करणे हाच एक मार्ग आहे.
झाडांनी वेढलेले क्षेत्र, उदाहरणार्थ, गावे आणि जंगले स्वच्छ वातावरणाचा अभिमान बाळगतात. कारण याचा प्रदूषणाचा कमी परिणाम होतो. दुसरीकडे, वाढत्या प्रदूषणामुळे आणि आजूबाजूला झाडांची कमी संख्या यामूळे शहरी निवासी आणि औद्योगिक भागात हवेची गुणवत्ता खराव आहे. वृक्षरोपणाचे महत्व इतके स्पष्ट असतानाही या उपक्रमात सहभागी होण्याची जबाबदारी प्रत्यक्षात स्विकारणे मोजकेच लोक आहेत. बाकीचे लोक त्यांच्या आयुष्यात इतके मग्न आहेत की, त्यांना समजत नाही की आजुबाजुला पुरेशी झाडे असल्याशिवाय आपण जास्त काळ जगु शकनार नाही. वृक्षारापनाचे महत्व ओळखुन त्यासाठी आपले योगदान देण्याची हिच वेळ आहे असे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले. सदर वृक्षारोपन कार्यक्रमामध्ये जिल्हा रुग्णालयाचे अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अविनाश पुरी, डॉ. बालाजी हरन, इतर डॉक्टर्स व कर्मचारी वृंद उपस्थीत होते.
0 Response to "डॉक्टर दिनानिमीत्त वाशिम जिल्हयातील डॉक्टरांनी केले जिल्हा रुग्णालयात वृक्षरोपन"
Post a Comment