वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शैक्षणिक साहित्य वाटप
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शैक्षणिक साहित्य वाटप
लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट मागील चौदा वर्षांपासून अनाथ, एकल पालकत्व, आदिवासी आणि दुर्लक्षित दुर्गम भागातील गरीब मुलांसोबत वाशिम जिल्ह्यात मानोरा, शेलुबाजार, पारडी टकमोर, शेंदूरजना, धाकली आणि महान या ठिकाणी काम करत आहे. प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे आणि तो शाळेत टिकला पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या साठी यावर्षी ४२० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या सोबत संस्था काम करत आहे.
याचाच एक भाग म्हणून यावर्षी वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे वर्ग ८ ते १० च्या ७४ गरजू मुलांना २७ जून २०२४ रोजी वह्या, पुस्तके, बॅग, कंपास, ग्राफ बुक, ड्रॉइंग बुक हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.
प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक प्रशंजीत भगतसर, सतीश भगतसर आणि ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी रामहरी इरकर, विजय खडसे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व पालकांनी डॉ. विली मॅडम यांचे धन्यवाद मानले. या साठी केंद्र कार्यकारी समाधान ठाकरे व शिक्षक भारत डेरे आणि स्वाती वाढोंनकार यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शैक्षणिक साहित्य वाटप"
Post a Comment