भगवानराव शिंदे राकाँ तालुकाध्यक्ष यांचे निवेदन तीन वर्षापासून शेतकरी निधीपासून वंचित
साप्ताहिक सागर आदित्य
भगवानराव शिंदे
राकाँ तालुकाध्यक्ष यांचे निवेदन तीन वर्षापासून शेतकरी निधीपासून वंचित
प्रधानमंत्री सन्मान योजनेचा निधी द्या
शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत प्रतिवर्ष देण्यात येणारा अनुदानाचा निधी हा तालुक्यातील शेलगाव बोदाडे यासह इतर गावातील असंख्य शेतकऱ्यांना हा मिळाला नाही मागील दोन ते तीन वर्षापासून पीएम किसान योजनेच्या निधीपासून शेतकरी वंचित असताना या निधीचे वाटप तात्काळ करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष भगवानराव शिंदे
यांच्यासह शेतकऱ्यातर्फे करण्यात आली असून जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे मालेगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी हे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या निधीपासून वंचित आहे परंतु शासनाकडून मात्र या वंचित शेतकऱ्यांच्या निधी वाटपाबाबत मात्र कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तर या निधीबाबत शेतकऱ्यांनी आतापर्यंत वारंवार मागणी केल्यानंतरही याबाबत कृषी विभागाकडून उडवा उडवीची उत्तरे दिल्या जात आहे.
जिल्हा कृषी अधिक्षक यांना निवेदन
वारंवार मागणी करुनही देण्यात आला नाही निधी
वंचित संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अरिफ शहा यांची तालुकाध्यक्ष भगवानराव शिंदे यांच्या नेतृत्वात भेट घेतली तसेच या भेटीदरम्यान त्यांनी पी एम किसान सन्मान योजनेच्या निधीचे वाटप हे तात्काळ करण्यात यावे अशी मागणी केली तर मागील अनेक महिन्यापासून या निधीचे असंख्य शेतकऱ्यांना वाटप झाले नसल्याचे ही कृषी अधीक्षकाच्या निर्देशनात आणून दिले. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना सन्मान निधीच्या वाटपाबाबत निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
तालुका अध्यक्ष भगवानराव शिंदे यांच्यासह महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली मेश्राम तसेच तालुक्यातील
डॉक्टर नारायणराव शेंडगे शंकर वाजुळकर जयंता इ रतकर आसिफ टेलर शेषराव वाझुळकर लक्ष्मण मस्के
विष्णू आवटे शंकर वाझुळकर दिनकरराव पुड राजकुमार शिंदे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
0 Response to "भगवानराव शिंदे राकाँ तालुकाध्यक्ष यांचे निवेदन तीन वर्षापासून शेतकरी निधीपासून वंचित"
Post a Comment