न्यायालयाच्या इमारतीची विभागीय आयुक्तांनी केली पाहणी
साप्ताहिक सागर आदित्य
न्यायालयाच्या इमारतीची विभागीय आयुक्तांनी केली पाहणी
नजीकच्या काळात येणाऱ्या पावसामुळे जुन्या झालेल्या मालेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीची पाहणी विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी (दि.२८) केली.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश एस. व्ही. हांडे, जिल्हाधिकारी एस. बुवनेश्वरी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर, ऊप कार्यकारी अभियंता ए. जे. शेख यांची ऊपस्थिती होती.
यावेळी संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. विभागीय आयुक्त पांडेय यांनी यावेळी न्यायालातील कर्मचारी व वकील संघाच्या अडचणी समजून घेतल्या व संबंधित यंत्रणांना सकारात्मक व कायदेशीर मार्ग काढण्याबाबत निर्देश दिले.
0 Response to "न्यायालयाच्या इमारतीची विभागीय आयुक्तांनी केली पाहणी"
Post a Comment