भारत प्राथमिक मराठी शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक मराठी शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा
रिसोड: येथील भारत प्राथमिक मराठी शाळेमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित योग कार्यशाळेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. यावेळी सूर्यनमस्कार ,कपालभाती, अनुलोम-विलोम,प्राणायाम ,पद्मासन ,पर्वतासन आदी योगासनांचा सराव करण्यात आला. योगासनाचे महत्त्व सांगताना मुख्याध्यापिका किरणताई दुबे म्हणाल्या की "योग ही एक जीवनशैली असून योगाला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे .योगाभ्यासामुळे दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून मुक्तता होऊन शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक स्थिरता लाभते ." सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संगीता दुपारते यांनी केले.
0 Response to "भारत प्राथमिक मराठी शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा "
Post a Comment