-->

योग हे शरीर, मन व आत्मा यांना जोडण्याचे एक साधन आहे”        मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे

योग हे शरीर, मन व आत्मा यांना जोडण्याचे एक साधन आहे” मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

"योग हे शरीर, मन व आत्मा यांना जोडण्याचे एक साधन आहे”

      मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे 


जिल्हा प्रशासनाच्या वतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ उत्साहात साजरा


वाशिम, “योग हे शरीर, मन व आत्मा यांना जोडण्याचे एक साधन आहे”. योगातुन सुदृढ व निरोगी जीवन जगता येते. केवळ २१ जुन रोजी योगा न करता सर्वांनी दररोज योगा करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले. २१ जून रोजी आयुष मंत्रालय भारत सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा शल्यचिकीत्सक, विविध योग संघटना, जिल्हा परिषद,सर्व शैक्षणिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा पुरस्कारार्थी, खेळाडु व मार्गदर्शक, स्कॉऊट गाईड ,एन.एस.एस.,एन.सी.सी. इत्यादी प्रशासकीय विभाग व जिल्ह्यातील योगसाधक यांच्या उस्फुर्त प्रतिसादाने १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात वाटाने लॉन येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.वाघमारे बोलत होते. कार्यक्रमास योगगुरू रामभाऊ छापरवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, तहसीलदार निलेश पळसकर,मुख्याधिकारी नगर परिषद निलेश गायकवाड, सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेज वाशिमचे संचालक, सामाजिक कार्यकर्ता वसंतराव धाडवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

   मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम यांच्यामार्फत रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 


नागरीकांना योगाचे निरंतर प्रशिक्षण मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात दररोज सकाळ व सायंकाळी कु. तेजस्वनी मानिकराव योगप्रशिक्षण देणार आहेत. 

योग दिनाच्या सुरूवातीला जिल्हा अध्यक्ष विद्याभारती प्रा. दिलीप जोशी यांनी उपस्थित योग साधकांना योग परिचय व योगाच्या विविध प्रकाराची माहिती देवुन त्यांच्या कडुन योगाचे विविध व्यायाम प्रकार करून घेतले. त्यानंतर योग प्रार्थना, चलन क्रीया व खडे आसन हे व्यायाम प्रकार प्रा. मुकुंद देशपांडे यांनी घेतले. बैठे आसन, पोटावरचे आसन, पाठीवरचे आसन हे कु. तेजस्विनी माणिकराव यांनी घेतले. योगाचा सार व शेवट प्राणायाम, ध्यान व शांतीपाठ हे योग शिक्षक जिल्हा परिषद संजय लहाने यांनी घेतले. योग दिनानिमीत्य प्रात्यक्षिक करून दाखविण्यासाठी कु. अनन्या शेळके, आयुष मुरलीधर शेळके, कृष्णा गजानन उंडाळ, ओम किशोर शिंदे, कु. भक्ती खंदारे, प्रांजल शेळके, रोशन शेळके, अभिनव शिंदे, प्रविण इंढोळे, आदित्य देशमुख, निखील देशमुख आदींनी उपस्थितांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमास योगा संयोजक माहिती शिक्षण संवाद तज्ञ जिल्हा परिषद श्रीमती पुष्पलता अफुने, यांनी कार्यक्रम आयोजनास सहकार्य केले. योग दिनास संगीत सेवा देणे करीता प्रा. डॉ. अनिल सोनुने, कु. प्रिती पाठक, कु. दिशा वानखेडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिलीप जोशी यांनी केले. वाटाणे लॉनचे दिनकराव वाटाणे, शिवाजीराव वाटाणे यांनी सहकार्य केले.  

योग दिनाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी किशोर बोंडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक मारोती सोनकांबळे, क्रीडा अधिकारी संतोष फुपाटे, क्रीडा अधिकारी, विजय बोदडे, वरिष्ठ लिपीक, प्रकाश मोरे, विकास तिडके, भारत वैद्य, मिर्झा कलीम कर्मचाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले. प्रास्ताविक राजेंद्र शिंदे यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी मानले.


#आंतरराष्ट्रीययोगदिन२०२४ 

#योग 

#IDY2024 

#InternationalDayOfYoga 

#YogaforSelfandSociety

0 Response to "योग हे शरीर, मन व आत्मा यांना जोडण्याचे एक साधन आहे” मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article