जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा
वाशिम, आद्य परिचारिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लोरेन्स नाईन्टींगेल यांचा जन्मदिवस हा दरवर्षी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. फ्लोरेन्स नाईन्टींगेल यांनी आपल्या सेवाभाव व समर्पण जगात परिचारिकेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो .वाशिम जिल्हा परिचारिका संघटनेच्यावतीने पंचायत समिती सभागृह वाशिम येथे नुकतेच जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून जागतिक परिचारिका दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रामहरी बेले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विजय काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा चव्हाण, साथरोग अधिकारी डॉ. मोबिन खान , मुल्यांकन व संनियंत्रण अधिकारी अविनाश जाधव,गटविकास अधिकारी गजानन खूळे आदींची उपस्थिती होती.
आपल्या सेवाभावी वृत्तीने सेवा देणाऱ्या परिचारिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी आरोग्य यंत्रणाचा परिचारिका ह्या कणा असल्याचे मनोगत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी व्यक्त केले. परिचारिका दिनानिमित्त वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे उपस्थित सर्व परिचारिकांचा उत्साह द्विगुणित झाला .यावेळी संघटनेच्या अध्यक्षा रवीता मनवर तसेच जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचर्या अधिकारी अल्का मैड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व फ्लोरेन्स नाईन्टींगल यांच्या समर्पवृत्तीचा वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात आम्ही सर्व परिचारिका समर्थपणे अविरतपणे पुढे चालवणार असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.
0 Response to "जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा"
Post a Comment