
ओबीसी महामंडळ कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजात ५० टक्के सवलत
साप्ताहिक सागर आदित्य
ओबीसी महामंडळ
कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजात ५० टक्के सवलत
वाशिम, ओबीसी महामंडळ अर्थात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेत एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत (OTS) देण्याबाबतची सुधारीत एकरकमी योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू करण्यात आली आहे.त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे.असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन.झुंजारे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,चिखली रोड, नालंदानगर, वाशिम येथे संपर्क साधावा.
0 Response to "ओबीसी महामंडळ कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजात ५० टक्के सवलत"
Post a Comment