मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
कारंजा येथील विद्यारंभ विद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम उत्साहात
जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
पथनाटय व रॅलीचे आयोजन
वाशिम, कारंजा येथील विद्यारंभ विद्यालय येथे तहसिल कार्यालय, कारंजा आणि विद्यारंभ विद्यालय यांच्या संयुक्त वतीने स्विप मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज 21 डिसेंबर रोजी उत्साहात करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,सहायक जिल्हाधिकारी तथा कारंजा तहसिलदार डॉ.अपुर्वा बासूर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे,तहसिलदार कुणाल झाल्टे,शाळेचे मुख्याध्यापक सुनिल झंवर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, नायब तहसिलदार हरणे व बनसोड यांची उपस्थिती होती.
स्विप मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत विद्यारंभ विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मतदार जनजागृतीवर पथनाटय सादर केले. तसेच यावेळी मतदार जनजागृती रांगोळी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती पथनाटय आणि उत्कृष्ट रांगोळी काढल्याबद्दल विद्यार्थ्यांचे श्रीमती बुवनेश्वरी यांनी कौतुक केले. ही मतदार जनजागृती रॅली कारंजा विद्यारंभ विद्यालयाच्या वतीने तहसिल कार्यालय ते जयस्तंभ चौक दरम्यान आयोजित करण्यात आली. प्रारंभी रॅलीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी शाळेचे अध्यक्ष सुनिल झंवर, संस्थेच्या सचिव अंजली झंवर, व्यवस्थापक रोशनी तळेकर, मुख्याध्यापक योगेश हगे, प्रभारी मुख्याध्यापक दिनेश फुंदे व उपमुख्याध्यापक संतोष देवरे यांची उपस्थिती होती. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पथनाटयातून विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक अजय बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Response to "मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन "
Post a Comment