
१ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल.
साप्ताहिक सागर आदित्य
मंत्रिमंडळनिर्णय
गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल. अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबद्धरितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याबाबत प्रशासनाने युद्धस्तरावर काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
0 Response to "१ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल. "
Post a Comment