-->

9 व 10 डिसेंबर रोजी  नागपूर येथे महारोजगार मेळावा

9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे महारोजगार मेळावा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

9 व 10 डिसेंबर रोजी

नागपूर येथे महारोजगार मेळावा


वाशिम, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार प्राप्त करुन देण्याचे काम शासनाच्या कोशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यामातून केले जात आहे. 


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्देशाप्रमाणे ९ व १० डिसेंबर २०२३ रोजी दोन दिवशीय नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळावा नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून विविध क्षेत्रातील किमान एक हजार कंपन्या या महारोजगार मेळाव्यात प्राधान्याने सहभागी होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ज्या कंपनी/ उद्योजक/ आस्थापनांकडे कुशल मनुष्यबळाची गरज असेल, अशा सर्व आस्थापनांनी या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आस्थापनेवर असणाऱ्या रिक्तपदांबाबतची माहिती  www.rojgar.mahaswayarm.gov.in या  वेबपोर्टलवर ऑनलाईन नोंदवावी. जेणेकरून आस्थापना व कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची मागणी तातडीने पुर्ण होण्यास मदत होईल. आणि जिल्ह्यातील बेरोजगार तरुण/तरुणींना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील.

           

या मेळाव्यात सहभागी होवून नोकरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्षपणे सहभागी व्हावे. यासाठी

www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी. Employment या टॅबवरील Job Seeker (Find a Job) हा पर्याय निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक/ आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने sign in करावे. आपल्या होम पेजवरील Pandit Dindayal Upadhyay Job Fair पर्याय निवडावा. Washim जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी NAMO MEGA JOB FAIR या ओळीतील मेनूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करावे. | Agree हा पर्याय निवडावा. पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिकपदांना Apply बटनावर क्लिक करावे. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल. याबाबत अधिक माहितीची आवश्यकता असल्यास किंवा उद्योजकांची नोंदणी करतांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण असल्यास जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयास (07252-231494) या भ्रमणध्वनी क्रमांकावर व दिपक भोळसे (9764794037/7775814153) या क्रमांकावर संपर्क साधावा. 

या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उद्योजकांनी तसेच नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवावा.असे आवाहन जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

                   

0 Response to "9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे महारोजगार मेळावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article