
साखळी उपोषण करण्याचा इशारा तेथील शेतकऱ्यांनी दिला आहे
साप्ताहिक सागर आदित्य
मौजे चौधरवाडी मधील सर्वे नंबर ३६,३६ ब ला सर्विस रोड न मिळाल्यास फलटण प्रांत कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करण्याचा इशारा तेथील शेतकऱ्यांनी दिला आहे
नवीन तयार होत असलेला राष्ट्रीय महामार्ग- ९६५ (आळंदी-फलटण-पंढरपूर) हा मौजे चौधरवाडी मधून जात आहे. चौधरवाडी हद्दीतील होळकर वस्ती शेजारी कॅनॉल वरून उड्डाणपूल तयार करण्याचे काम जोरात चालू आहे. परंतु या कामामुळे होळकर वस्ती व सर्वे नंबर ३६ व ३६ ब चा ये- जा व मालवाहतूक करणार रस्ता पूर्ण कायमचा बंद केला जात आहे. तसेच एका बाजूला रेल्वे लाईन आहे व सर्विस रोड ही आम्हाला दिला जात नाही . संदर्भीयपत्राबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केल्या असता उडवा- उडवीची उत्तरे दिली जात आहेत. सर्वे नंबर ३६ व ३६ ब (एकूण साधारण क्षेत्र १९ एकर) मधील सर्व अर्जदारांचे जीवन व उदरनिर्वाहाचे साधन हे शेती वरती अवलंबून आहे.
परंतु कॅनॉल वरती तयार होत असलेल्या पुलाची उंची कॅनॉलच्या वरील भरी पासून साधारण ८ ते १२ फूट तर कॅनॉलच्या लगतच्या जुन्या रस्त्यापासून साधारण २५ ते ३५ फूट उंचावर हा पूल तयार केला जात आहे. तोही ओतीव भिंती बांधून. या भिंती शेजारी पण सर्विस रोड तयार करायला हवा होता परंतु तोही तयार केला जात नाही (नकाशात रस्ता नाही असे सांगितले जात आहे). यामुळे शेतात तयार होणारा माल बाहेर काढता येणार नाही तसेच राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रोजची कामे व मुलाबाळांना ये-जा करणे. म्हणजेच आमच्या सर्वांच्या मूलभूत अधिकारांवरच गदा येते आहे. त्यामुळे तयार होत असलेल्या पुलाच्या चालू कामात पुलाखालून सर्विस रोड तयार करून तोच कॅनॉल लगतचा जुना रस्ता किंवा राष्ट्रीय महामार्ग लगत सर्विस रोड हा ये-जा व मालवाहतुकीला तयार करून आमच्या जीवाचे व मूलभूत अधिकारांचे रक्षण करावे, नाहीतर दिनांक ३०/१०/२०२३ पासून मा. प्रांत साहेबांच्या कार्यालयाबाहेर आम्ही सर्व अर्जदार साखळी उपोषणाला बसणार आहोत याची ही नोंद घेण्यात यावी. एकीकडे देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे आणि दुसरीकडे आमच्यावर अन्याय लादला जात आहे. त्यामुळे कॅनॉल लगतचा जुना रस्ता किंवा राष्ट्रीय महामार्ग लगत सर्विस रोड या दोन्ही मधील एक रस्ता तयार करण्याचे आदेश तात्काळ देऊन सर्व अर्जदारांना तात्काळ नैसर्गिक न्याय देऊन त्यांच्या जीवाचे रक्षण करावे ही मागणी फलटण मधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा(ताई) धोंडीराम खरात यांनी या निवेदनाद्वारे ही मागणी शेतकरी बांधवांच्या वतीने केली आहे.
0 Response to "साखळी उपोषण करण्याचा इशारा तेथील शेतकऱ्यांनी दिला आहे"
Post a Comment