
दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मान्यता
साप्ताहिक सागर आदित्य
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
दिनांक : 14 ऑक्टोबर 2022
दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना
अग्रीम देण्यास मान्यता
मुंबई, दि. १४ : राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी मान्यता दिली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे.
उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. दिवाळीच्या काळात या अग्रीमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते.
-----०-----
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
दिनांक : 14 ऑक्टोबर 2022
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे
करण्यासाठी मंत्रिमंडळाची नवीन उपसम
मुंबई, दि. १४ : मराडवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्याकरिता मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांचा समावेश असलेली नवीन मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
या समितीत रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे असतील. औरंगाबादचे विभागीय आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम निश्चित करतील. तसेच यासाठी येणारा सुधारित खर्चाचा आराखडाही सादर करतील.
0 Response to "दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मान्यता"
Post a Comment