-->

18 ऑक्टोबरला रोजगार मेळावा   रोजगार इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे

18 ऑक्टोबरला रोजगार मेळावा रोजगार इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

18 ऑक्टोबरला रोजगार मेळावा 

रोजगार इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे 

वाशिम  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप रोजगार व उद्योजकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजस्थान आर्य महाविद्यालय,वाशिम यांच्या संयुक्त वतीने 18 ऑक्टोबर रोजी राजस्थान आर्य महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

    या मेळाव्यामध्ये राज्यातील नामांकित उद्योजक किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखतीद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे. ज्या रोजगार इच्छुक उमेदवारांचे किमान दहावी, बारावी,आयटीआय( इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड) पदवीधर (कला,वाणिज्य, विज्ञान) इंजीनियरिंग डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रता असून  ते 45 वयोगटातील या मेळाव्यात उपस्थित रहावे या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना विविध प्रकारच्या पदनामांकरिता 500 पेक्षा जास्त रिक्त पदांवर रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे.

      जिल्ह्यातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विहित पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊन आरे कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ वाशिम येथे आधार कार्ड,शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स प्रति, व दोन फोटो घेऊन प्रत्यक्षपणे उपस्थित राहावे.या मेळाव्यात प्रत्यक्षपणे उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्याकडील सेवायोजन कार्डच्या युजरनेम व पासवर्ड मधून प्रक्रियेनुसार ऑनलाईन सहभाग सुद्धा नोंदवावा.अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिम येथील 07252 -231494 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Posts

0 Response to "18 ऑक्टोबरला रोजगार मेळावा रोजगार इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article