
युवा राज्यस्तरीय अभ्यासक्रमाचे उद्घाटन यशोमती ठाकूर आमदार तथा माजी पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न.
साप्ताहिक सागर आदित्य
युवा राज्यस्तरीय अभ्यासक्रमाचे उद्घाटन यशोमती ठाकूर आमदार तथा माजी पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न.
विदर्भ स्तरीय युवा नेतृत्व विकास अभ्यासक्रम 2022 अनुभव शिक्षा केंद्र यांचा पुढाकार
वाशिम - अमरावती येथे अनुभव शिक्षा केंद्र वाशिम- अमरावती अंतर्गत युवा राज्यस्तरीय अभ्यासक्रम ५ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत अमरावती येथे करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून लाभलेल्या महिला व बाल विकास माजी मंत्री तथा आमदार तिवसा आणि वडगाव मतदार संघाचे आमदार यशोमती ताई ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते छोटू दादा उर्फ हर्षल,महाराष्ट्र राज्य समन्वयक अनुभव शिक्षा केंद्र सचिन नाचणेकर,वाशिम-अमरावती प्रशिक्षक आशिष धोंगडे,अकोला जिल्हा प्रशिक्षक कोमल आकाळ, वर्धा यवतमाळ जिल्हा प्रशिक्षक करिष्मा मुनेश्वर नागपूर भंडारा जिल्हा प्रशिक्षक पपीता चांदणे, वाशिम जिल्हा अध्यक्ष प्रदिप पट्टेबहादुर,अमरावती जिल्हाध्यक्ष भूषण रामाघरे,च्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी बोलताना म्हणाले की युवा नेतृत्व विकास आणि युवकांचे संघटन होऊन या देशाचे चित्र हे बदलण्याची गरज तुम्हा युवकांच्या खांद्यावरती लाधलेली आहे.अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून युवकांसाठी जो प्लॅटफॉर्म संधी उपलब्ध करून देत युवकांमध्ये विकास घडविण्याचे काम अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत केले जात आहे.हे खरोखरच या देशाच्या हितरक्षणाच्या कार्याशी उणीव अंगी बाळगून मी सर्व युवकांना शुभेच्छा देतो.यावेळी सचिन नाचनेकर यांनी या विदर्भस्तरीय अभ्यासक्रम कार्यक्रमाची रूपरेषा आणि गेल्या 34 वर्षापासून अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून युवकां साठी कार्य करीत आहे.यावेळी छोटू दादा यांनी मार्गदर्शनातून युवकांना मार्गदर्शन केले.विद्यार्थी युवा देशातील योग्य तो प्रयास शिक्षण घेऊन नेतृत्व केले पाहिजे.या सर्व बाबि युवा दशेत मिळत असतात.तर यावेळी वाशिम अमरावती प्रशिक्षक आशिष धोंगडे यांनी अनुभव व संविधानाचे जे सहा मूल्य आहेत.यामध्ये सामाजिक न्याय,श्रम प्रतिष्ठान,पर्यावरण, लिंगभावतील न्याय,लोकशाही/ धर्मनिरपेक्षता,प्रामाणिकपणा /उत्तरदायित्व विषयावर सहा मूल्यांचे शिकवण सविस्तर विशद करून मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणाला वाशिम,यवतमाळ,अमरावती, नागपूर,वर्धा,येथील युवक व युवती यांची या प्रशिक्षणाला उपस्थित असून प्रशिक्षक आशिष धोंगडे व वाशिम जिल्हा अध्यक्ष युवा सामाजिक कार्यकर्ते अनुभव साथी प्रदीप पट्टेबहादूर यांनी यशोमती ताई ठाकूर यांना संविधानाची प्रस्तावना व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष धोंगडे यांनी केले.पाच दिवसीय प्रशिक्षणाची उपरेषा आणि पाया या प्रस्तावनेतून मांडला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिका धोंडे,यांनी केले.उपस्थित सर्व मान्यवरांचे व प्रशिक्षकांचे आभार नंदिनी इंगळे प्रशिक्षणार्थी युतीने मानले.अशाप्रकारे हे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले.
0 Response to "युवा राज्यस्तरीय अभ्यासक्रमाचे उद्घाटन यशोमती ठाकूर आमदार तथा माजी पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न."
Post a Comment