
मोरया ब्लड डोनर ग्रुपचा लालबागचा राजा अध्यक्षांकडून सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य
मोरया ब्लड डोनर ग्रुपचा लालबागचा राजा अध्यक्षांकडून सत्कार
वाशिम - मागील २०१६ पासून रक्तदान व जनजागृती चळवळीत कार्यरत असलेल्या मोरया बहूउद्देशिय संस्था व्दारा संचालीत मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या पदाधिकार्यांचा ७ सप्टेंबर रोजी मुंबई येथील लालबागचा राजाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व लालबागचा राजा मंडळाची माहिती पुस्तीका देवून सत्कार करण्यात आला.
रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यात झोकून काम करणार्या मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या माध्यमातुन युवकांनी संपुर्ण राज्यात जनजागृती मोठे काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नाने आतापर्यत हजारो गंभीर रुग्णांना वेळेवर रक्ताचा पुरवठा होवून त्यांचे जीव वाचले आहेत. ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कोणताही स्वार्थ न पाहता निस्वार्थ भावनेने रक्तदानाच्या या कार्यात सहभागी असून त्यांच्या जनजागृतीमुळे राज्यातील रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक तरुण रक्तदानासाठी स्वत:हून पुढे येत आहेत. मुंबई येथील लालबागच्या राजाचे दर्शन घेवून भाविक भक्तांमध्ये रक्तदान जनजागृतीसाठी गेलेल्या मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या कार्याची लालबागच्या राज्याच्या मंडळाने स्वत:हून दखल घेवून त्यांचा त्याठिकाणी भावपूर्ण सत्कार केला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष महेश धोंगडे यांनी सर्व पदाधिकार्यांच्या वतीने हा सत्कार स्विकारुन मंडळाचे आभार मानले.
सहा वर्षापुर्वी महेश धोंगडे व इतर समयुवा युवकांनी रक्तदान व जनजागृतीचा उदात्त हेतू समोर ठेवून या संस्थेची स्थापना केली होती. या माध्यमातून अनेक शिबीरे घेवून संस्थेमधील युवकांनी स्वत: अनेकवेळा रक्तदान केले. तसेच अडचणीच्या वेळेस वृत्तपत्रे व सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतर रक्तदात्यांना आवाहन करुन त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत केले. सहा वर्षापुर्वी रक्तदानाचे लावलेले रोपटे आता डेरेदार वटवृक्षात रुपांतरीत झाले असून या चळवळीतुन गेल्या सहा वर्षात महाराष्ट्रातील हजारो गरजु रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. रक्तदानाच्या या महान कार्याबद्दल केंद्रीय परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे सत्कार करण्यात आला होता. तसेच राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडून आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या हस्ते मुंबई येे उत्कृष्ट रक्तसेवक पुरस्काराने ग्रुपला सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय खा. भावनाताई गवळी, शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आ. लखन मलीक, आ. राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. निवासी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे आदींच्या हस्ते मोरया ब्लड डोनर ग्रुपचा सत्कार करण्यात आला आहे.
रक्तदानाच्या या चळवळीमध्ये मोरया ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष महेश धोंगडे, मार्गदर्शक योगेश लोनसुने, उपाध्यक्ष अक्षय हजारे, नारायण व्यास, श्याम खोले पाटील, निलेश खोरणे, अक्षय धोंगडे, अनिल दरने, गणेश धोंगडे, आनंद भावसार, अजय तोडकर, रवी धोंगडे, नाना देशमुख, स्वप्निल विटोकार, कोळी, मनोज चौधरी, राम लांडगे, गोपाल इकडे, ऋषिकेश अंभोरे, शुभम शेळके, श्याम खोले, आकाश चव्हाण, निखिल देव, विकी गायकवाड, महेश कदम, गजानन धोंगडे, विलास धोंगडे, दिनेश भिमटे आदी युवक झोकुन व निस्वार्थ भावनेने काम करत आहेत.
0 Response to "मोरया ब्लड डोनर ग्रुपचा लालबागचा राजा अध्यक्षांकडून सत्कार"
Post a Comment