-->

राष्ट्रीय नमुना पाहणीची ७९ वी फेरी  क्षेत्रीय सर्वेक्षण कार्यक्रम जाहिर

राष्ट्रीय नमुना पाहणीची ७९ वी फेरी क्षेत्रीय सर्वेक्षण कार्यक्रम जाहिर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राष्ट्रीय नमुना पाहणीची ७९ वी फेरी

क्षेत्रीय सर्वेक्षण कार्यक्रम जाहिर

         वाशिम,  : भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वये मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत १९५० पासुन दरवर्षी नमुना पाहणी करण्यात येते. या अतंर्गत विविध योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी व सामाजिक आर्थिक निर्देशांकाची परिगणना करण्यासाठी माहिती गोळा करण्यात येते.

          राष्ट्रीय नमुना पाहणी ७९ वी फेरीमध्ये सामाजिक आर्थिक निर्देशांकावरील सर्व सामावेशक माहिती गोळा करण्यात येणार आहे. यात सुरक्षित व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सेवा वापरणाऱ्या लोकसंखेचे प्रमाण, स्वच्छता करीता असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा, संगणक व मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या, इंटरनेट सुविधा वापरणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी, बँकेत खाते असणाऱ्या महिलांची टक्केवारी, शालेय शिक्षणाची सरासरी, आयुष प्रणालीबाबत जनतेमधील जागरुकता व वैद्यकीय खर्च इत्यादी बाबींची माहिती या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. या आधारे शाश्वत विकास ध्येयमधील निर्देशांक व जागतीक स्तरावरील उप निर्देशांक काढण्यास मदत होणार आहे.

           तरी शासनाच्या या उपक्रमात जनतेनी सहभागी होऊन सहकार्य करावे. सांख्यिकी कार्यालयामार्फत आलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन शासनाच्या या उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रहिताच्या दृष्टीने सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रफुल्ल पांडे यांनी केले आहे.







Related Posts

0 Response to "राष्ट्रीय नमुना पाहणीची ७९ वी फेरी क्षेत्रीय सर्वेक्षण कार्यक्रम जाहिर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article