
आझादी का अमृत महोत्सव निमित्त पथनाट्याद्वारे जनजागृती श्री.पांडुरंग विद्यालयाचा अभिनव उपक्रम पिंपळा:
साप्ताहिक सागर आदित्य
आझादी का अमृत महोत्सव निमित्त पथनाट्याद्वारे जनजागृती
श्री.पांडुरंग विद्यालयाचा अभिनव उपक्रम
पिंपळा:- हर घर झंडा, घर घर झंडा या उपक्रमांतर्गत शिक्षणाधिकारी कार्यालय वाशिम व जिल्हा भारत स्काऊट व गाईड कार्यालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मालेगाव तालुक्यातील पिंपळा येथील श्री.पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस स्काऊट पथक व क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्काऊट पथक यांनी आझादी का अमृत महोत्सव निमित्त जनजागृतीपर पर पथनाट्य तयार करून विविध गावात त्याचे सादरीकरण करण्यात आले.
या पथनाट्याची निर्मिती विद्यालयातील स्काऊट मास्टर नितेश भिंगे सर व क्रीडा मार्गदर्शक जी.डी.कोरडे सर यांनी केली.यामध्ये विद्यालयातील दोन्हीही पथकातील स्काऊटस् नी दि.१३ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान तिरंगा ध्वज प्रत्येक घरी फडकवायचा असतांना घ्यावयाची काळजी व त्याची संहिता याबाबतची जनजागृती केली.या पथनाट्यात आपल्या देशाबद्दल असलेली आपली कर्तव्य व जबाबदारी तसेच संहिता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून आपल्या राट्रध्वजाचा अवमान होणार नाही याबद्दल लोकांमध्ये स्काऊट पथकांनी आपल्या बोली भाषेत व विविध राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन पथनाट्याद्वारे सादरीकरण केले.
या पथनाट्याने परिसरातील पिंपळा,आमखेडा,हनवतखेडा या गावांमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले.
या पथनाट्याला संस्थेचे अध्यक्ष अनिल गवळी सर व विद्यालयाचे प्राचार्य आर.एन.देशमुख सर व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारीवृंद यांचे मोलाचे योगदान लाभले.
0 Response to "आझादी का अमृत महोत्सव निमित्त पथनाट्याद्वारे जनजागृती श्री.पांडुरंग विद्यालयाचा अभिनव उपक्रम पिंपळा:"
Post a Comment