भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा जनजागृती साठी विविध कार्यक्रम आयोजित -
साप्ताहिक सागर आदित्य
भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे आजादी का अमृत महोत्सव
हर घर तिरंगा जनजागृती साठी विविध कार्यक्रम आयोजित -
आज दिनांक 10 ऑगस्ट २०२२ बुधवार रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शालेय शिक्षण परिपत्रकानुसार 'हर-घर तिरंगा'या उपक्रमाच्या निमित्ताने भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे विविध प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य राजेश नंदकुले उपस्थित होते, प्रमुख उपस्थिती मध्ये रिसोड चे ठाणेदार ठाकूर ,शाळेचे उपप्राचार्य सुभाष पवार, पर्यवेक्षक संजय भांडेकर सर ,विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य काटे सर, त्याचबरोर शाळेतील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य नंदकुले सर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, घर-घर तिरंगा, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सर्वांनी आपल्या घरी राष्ट्रध्वजाची संहिता पाळून १३,१४ व १५ तारखेला तिरंगाध्वज उभारावा,तसेच विद्यार्थी नि
निबंध स्पर्धा, चित्रकला, रांगोळी स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमीच तत्पर असावे आव्हान केले
0 Response to "भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा जनजागृती साठी विविध कार्यक्रम आयोजित -"
Post a Comment