सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय वार्षिक सत्रांत सभा उत्साहात संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य/
सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय वार्षिक सत्रांत सभा उत्साहात संपन्न
स्थानिक श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिम येथे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय वार्षिक सत्रांत सभा नुकतीच संपन्न झाली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री सरस्वती प्रगत विद्या प्रसारक मंडळ, वाशिम चे संचालक मनोजभाऊ कोठारी हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून रा.से.यो जिल्हा समन्वयक डॉ. योगेश पोहोकार, रिसोड व मालेगाव क्षेत्रीय समन्वयक डॉ. प्रविण हाडे, मानोरा व मंगरूळपीरचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. संजय इंगळे, वाशिमचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. गजानन बनचरे, श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य उद्धव जमदाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. योगेश पोहोकार यांना उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या जिल्हास्तरीय वार्षिक सत्रांत सभेचे प्रास्ताविक प्रा. अशोक वाघ यांनी केले त्यानंतर कु. अश्विनी जवंजाळे यांनी स्वागत गीत सादर केले. कारंजा येथील के. एन. कॉलेजचे डॉ. किरण वाघमारे, मंगरूळपीर येथील पी .एन. कॉलेजचे डॉ प्रमोद तायडे, शिरपूर जैन येथील स्वर्गीय पुंडलीकराव गवळी महाविद्यालयाचे डॉ. सचिन तायडे, कारंजा येथील ईनानी महाविद्यालयाचे डॉ. माथुरकर,कारंजा लाड येथील के एन कॉलेजच्या डॉ. निलम छंगाणी, रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाच्या डॉ.भारती देशमुख, डॉ. प्रविण हाडे, डॉ. संजय इंगळे, डॉ.गजानन बनचरे यांनी या सभेत आपले मत मांडले.
त्यानंतर डॉ योगेश पोहोकार यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आणि क्षेत्रीय समन्वयक यांनी मांडलेल्या मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. महावीर धाबे यांनी केले. सदर जिल्हास्तरीय वार्षिक सत्रांत सभेसाठी रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक वाघ, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन इंगोले, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.शीतल उजाडे यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय वार्षिक सत्रांत सभा उत्साहात संपन्न"
Post a Comment