-->

श्री सरस्वती समाजकार्य  महाविद्यालयाचे ग्रामीण शिबीर चिखली येथे संपन्न

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे ग्रामीण शिबीर चिखली येथे संपन्न


साप्ताहिक सागर आदित्य/
श्री सरस्वती समाजकार्य  महाविद्यालयाचे ग्रामीण शिबीर चिखली येथे संपन्न

वाशिम - श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील एम.एस. डब्ल्यू ( MSW )भाग 1 च्या विद्यार्थ्यांनी  क्षेत्रकार्य अंतर्गत पाच दिवसीय ग्रामीण शिबीर चिखली (बु)येथे नुकतेच संपन्न झाले. पाच दिवसीय शिबिरा मध्ये गावची पाहणी झाली, गावाच्‍या आर्थिक संरचनेचा अभ्यास,कृषी क्षेत्राचा अभ्यास, गावातील सामाजिक व सांस्कृतिक घटकांचा अभ्यास, गावातील वृद्ध व्यक्ती सोबत चर्चा, स्वच्छता अभियान, रमाई घरकुल सर्वेक्षण, रॅली, पोस्टर सादरीकरण, इत्यादी उपक्रम राबविण्यात आले,शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच सौ.वर्षाताई सुर्वे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक श्रीराम चोपडे सर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक जावळे सर,क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा. संदीप शिंदे सर यावेळी उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली, सुमित झुंगरे या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली, सूत्रसंचालन ओमकार शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन सावके  या यांनी केले,सदर कार्यक्रमाला पवन भाऊ, कु.पूजा प्रधान, निलेश खाडे,कु.नेहा कासार,अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी  यावेळी उपस्थित होते.

 

 




0 Response to "श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे ग्रामीण शिबीर चिखली येथे संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article