वैरणाकरीता शेवगा लागवडीसाठी ३० हजार रूपये अनुदान उपलब्ध
साप्ताहिक सागर आदित्य/
वैरणाकरीता शेवगा लागवडीसाठी ३० हजार रूपये अनुदान उपलब्ध
वाशिम : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणासाठी शेवगा लागवड करण्याकरीता (अनुसूचित जाती उपयोजना) प्रती हेक्टर ३० हजार रूपये प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत प्रती जिल्हा १५ हेक्टर क्षेत्राकरीता ४.५ लक्ष याप्रमाणे एकूण ३४ जिल्हयांकरीता १ कोटी ५३ लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी/ पशुपालकांना वैरणासाठी शेवगा लागवड करण्याकरीता अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. प्रती हेक्टरी ७.५ किलो शेवगा (पीकेएम-1) बियाण्याची किंमत ६ हजार ७५० व उर्वरित २३ हजार २५० अनुदान हे लाभार्थ्यांना दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येईल. यामध्ये पशुपालकांना बियाण्याचा थेट पुरवठा करण्यात येणार आहे. उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.
योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकरी, पशुपालक यांनी संबंधित जिल्हयाच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
0 Response to "वैरणाकरीता शेवगा लागवडीसाठी ३० हजार रूपये अनुदान उपलब्ध"
Post a Comment