-->

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे क्रांतीसुर्य ते विश्वरत्न लोकजागर महोत्सव -२०२२ ची उत्साहात सांगता

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे क्रांतीसुर्य ते विश्वरत्न लोकजागर महोत्सव -२०२२ ची उत्साहात सांगता


साप्ताहिक सागर आदित्य/

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे क्रांतीसुर्य ते विश्वरत्न लोकजागर महोत्सव -२०२२ ची उत्साहात सांगता.

वाशिम : स्थानिक श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच सामाजिक समता सप्ताह निमित्ताने  क्रांतीसुर्य ते विश्वरत्न लोकजागरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज या महोत्सवाची सांगता करण्यात आली.
सदर समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य उद्धव जमधाडे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून .प्रा. डॉ. संदीप शिंदे, प्रा. डॉ. देवानंद अंभोरे , प्रा.डॉ. उन्मेश घुगे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक वाघ उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा.डॉ.संदीप शिंदे यांनी सदिच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्य उद्धव जमधाडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. सदर समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज राठोड यांनी केले.

     ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धासंपन्न

क्रांतीसुर्य ते विश्वरत्न लोकजागर महोत्सव-२०२२ च्या सांगता प्रसंगी ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजूषा घेण्यात आली. या ऑनलाइन प्रश्नमंजुषे मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ऑनलाइन प्रश्नमंजुषा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. दिगंबरकुमार लांडगे, डॉ.प्रा. प्रशांत बुकणे, डॉ.प्रा.शीतल उजाडे, डॉ.प्रा. रवींद्र मडावी यांनी परिश्रम घेतले.

 




0 Response to "श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे क्रांतीसुर्य ते विश्वरत्न लोकजागर महोत्सव -२०२२ ची उत्साहात सांगता"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article