
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञान संपादना सोबत सामाजिक ज्ञान आत्मसात करावे.- डॉ. संघरक्षित भदरगे
साप्ताहिक सागर आदित्य/
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञान संपादना सोबत सामाजिक ज्ञान आत्मसात करावे.- डॉ. संघरक्षित भदरगे
विद्यार्थ्यांनी सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेताना शैक्षणिक ज्ञान संपादना सोबत सामाजिक ज्ञान आत्मसात करावे असे प्रतिपादन डॉ. प्रा. संघरक्षित भदरगे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य उध्दव जमधाडे उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक डॉ. देवानंद अंभोरे प्रा. राजेंद्र इंगोले, प्रा.उद्धव बनकर, प्रा.दिगंबरकुमार लांडगे, डॉ. उन्मेश घुगे, डॉ. पूर्णिमा संधानी आदी प्राध्यापक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक वाघ , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन इंगोले , महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.शितल उजाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज राठोड यांनी केली.
0 Response to "विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञान संपादना सोबत सामाजिक ज्ञान आत्मसात करावे.- डॉ. संघरक्षित भदरगे"
Post a Comment