यंदा दोन वर्षानंतर चैत्र वारी, विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
साप्ताहिक सागर आदित्य/
यंदा दोन वर्षानंतर चैत्र वारी, विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दोन वर्षानंतर पंढरपुरात चैत्र वारीचा उत्साह पाहायला मिळाला , त्यातच पांडुरंगाचा पदस्पर्श दर्शन मिळाल्यामुळे भाविक आनंदून गेलेत. मठ, धर्मशाळा सुद्धा भाविकांनी गच्च भरून केल्यात. पांडुरंगाच सावळे रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या
एकीकडे चैत्र वारी चा मोठा उत्सव पाहायला मिळतोय गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे यात्रा भाविका विनाच पार पडली होती. मात्र आता सावळ्या विठ्ठलाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी पंढरपुरात दाखल झाली
कोरोना नंतर गुढीपाडव्यापासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन चालू झाल. त्यानंतर ही पहिलीच चैत्र वारीच्या निमित्ताने पंढरपूर लाखो भाविक दाखल झाले विशेषता मराठवाडा, विदर्भातील भाविक जास्त प्रमाणात पंढरपुरात दाखल झालेत प्रशासनाच्या माहितीनुसार तीन ते चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. यात्रेच्या निमित्ताने नगरपालिकेने, पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे मंदिर समितीने सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय असेल, दर्शन रांगेची सोय चांगल्या प्रकारे केले. भाविकांनी मोठ्या प्रमाणात पांडुरंगाचे दर्शन घेतले, पंढरपूर नगरी विठ्ठल नामाने दनदनुन गेली.
0 Response to "यंदा दोन वर्षानंतर चैत्र वारी, विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी"
Post a Comment