बिटोडा भोयर येथील आनंदी पेट्रोलपंपावरील पिस्तुल दाखवून कॅश लुटणाऱ्या तीन आरोपींना आसेगांव पोलीसांनी केले अटक
साप्ताहिक सागर आदित्य/
बिटोडा भोयर येथील आनंदी पेट्रोलपंपावरील पिस्तुल दाखवून कॅश लुटणाऱ्या तीन आरोपींना आसेगांव पोलीसांनी केले अटक
दि. ०१/०३/२०२२ रोजी सायंकाळी ०७:३० वा. मंगरूळपीर ने वाशिम रोड वरील बिटोडा भोयर येथील आनंदी पेट्रोलपंपाचे कामगार गौतम विठ्ठल खंदारे हे एकटेच असतांना, काळया रंगाची पल्सर मोटार सायकलवर २५ ते ३० वयोगटातील तीन ईसम तोंडाला बांधुन आले त्या विमांनी प्रथम ५० रू व पुन्हा ३०० रु. में पेट्रोल टाकुन घेतले आणि पेट्रोलचे पैसे दिले गौतम खंदारे हे पैसे मोजत असतांना त्या तिपापैकी एकाने गौतम खंदारे यांचे गळ्यात हात टाकुन पकडुन, त्याच्या जवळील पिस्तुल (देशी कट्टा) गीतम खंदारे यांचे डोक्याला लावली तेव्हा दुस-याने गौतम खंदारे यांचे गळयात असलेली पैशाची बॅग व त्यातील १४,००० / रू. जबरीने हिसकावुन काढून घेतली आणि ते तिथे त्या मोटार सायकलवर बसुन वाशिम रोडने भरधाव वेगाने पळून गेले. यावरून पोलीस स्टेशन आसेगांव अप. क्र. ५२/२०२२ कलम३९७,३४ भादंवि सहकलम ३, २५ आर्म्स अॅक्ट अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम, गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक वाशिम व यशवंत केडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर यांनी सदर गुन्हयाची गांभीर्याने दखल घेउन आरोपींचा शोध घेण्याकरिता मार्गदर्शक सुचना दिल्या. आरोपी नामे सर्जेराव ऊर्फ प्रिन्स रोहीदास होलपदे, वय २२ वर्षे, रा. करंजी ता. वसमत जि. हिंगोली, देवानंद ऊर्फ लखन बालाजी दुधमोगरे, वय २१ वर्षे, रा. खांडेगांव, ता वसमत, जि. हिंगोली राजु एकनाथ चव्हाण, वय २१ वर्षे, रा. खांडेगांव, ता. वसमत, जि. हिंगोली यांना ताब्यात घेउन दि.१६/०४/२०२२ रोजी अटक करण्यात आलेली आहे.
0 Response to "बिटोडा भोयर येथील आनंदी पेट्रोलपंपावरील पिस्तुल दाखवून कॅश लुटणाऱ्या तीन आरोपींना आसेगांव पोलीसांनी केले अटक"
Post a Comment