नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशावर शिक्कामोर्तब, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात राज्य सरकारनं घेतला निर्णय
साप्ताहिक सागर आदित्य/
नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशावर शिक्कामोर्तब, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात राज्य सरकारनं घेतला निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जिल्ह्यात भोंग्यांसंदर्भात दिलेल्या नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेआदेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येत आहे. कारण आताच समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक असणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.दरम्यान आज पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी परवानगी अनिवार्य अंमलबजावणी बाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं की, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सोबत बैठक घेणार आहेत. राज्यातील कायदा व्यवस्थावर चर्चा करून एक दिशानिर्देश तयार करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसांत गाईडलाईन जारी केले जाई. सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश
नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मियांनी देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी. अजाणपूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मीटर लांब हनुमान चालीसा लावता येईल, असे आदेश काढण्यात आला आहे.नाशिकमधील 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. तसंच त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यात नमूद केलंय. इतकंच काय तर पोलीस आयुक्तांनी नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण न करण्याचा इशाराही दिला आहे.
0 Response to "नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशावर शिक्कामोर्तब, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात राज्य सरकारनं घेतला निर्णय"
Post a Comment