-->

रस्ता सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रस्ता सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


साप्ताहिक सागर आदित्य/

प्राणहानी व अपघात टाळण्यासाठी
रस्ता सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सभा

वाशिम
दि. ०६ जिल्हयातून काही राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच काही जिल्हा मार्ग जातात. मोठया प्रमाणात या रस्त्यांची कामे झाली आहे. त्यामुळे या मार्गाने माल वाहतूक व प्रवाशी वाहतूक वेगाने होत आहे. तसेच दुचाकीस्वार या मार्गाचा उपयोग करीत आहे. या मार्गावर अपघात होणार नाही तसेच जर अपघात झाला तर प्राणहानी होणार नाही याकरीता संबंधित विभागाने योग्य समन्वयातून रस्ता सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

           आज ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे, वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिपक मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजेंद्र शिंदे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सोयस्कर व वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

            षण्मुगराजन म्हणाले, रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी १०८ क्रमांकाची ॲम्बुलन्स ही वेळेत घटनास्थळी पोहोचली पाहिजे. वाशिम-कारंजा मार्गावर असलेल्या गावातून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या मार्गावर स्पीडब्रेकर लावण्याची कार्यवाही करण्यात यावी. ज्यामुळे गावातून या मार्गावर येणारे थेट वाहन हे रस्त्यावर येवून अपघातास कारणीभूत ठरणार नाही. अशा ठिकाणी स्पीडब्रेकर लावून अपघाताला आळा घालता येईल. वाशिम शहरात मुख्य मार्गावर अकोला नाका व पुसद नाका येथे वाहतूकीची कोंडी होणार नाही यासाठी खाजगी प्रवासी वाहने थांबविण्याचे स्थळ निश्चित करण्यात यावे. महामार्गावर वन्य प्राण्यांच्या भ्रमणमार्गात वाहनांच्या अपघाताची शक्यता असते. अशा ठिकाणी वन्य प्राण्यांच्या चित्रासह मर्यादित वेगाचे फलक लावावे. तसेच तेथे सोलर लॅम्पदेखील लावण्यात यावे. गतिरोधकाची उंची ही नियमानुसार असावी त्यामुळे वाहनांचे नुकसान होणार नाही आणि स्पीडब्रेकरवर अपघात होणार नाही. असे त्यांनी सांगीतले.

           हिरडे यांनी अपघात झाल्यावर पोलीसांनी तातकाळ फोटो व माहिती आयआरएडी ॲपवर अपलोड करावी. असे सांगीतले. महिंद्रा मॅक्झीमो, सुप्रो व टाटा मॅजीक इत्यादी खाजगी वाहनांची यापुढे नोंदणी न करता या वाहनांची प्रवाशी वाहन म्हणून नोंदणी करण्यात येईल. शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवून येत असेल तर पोलीस व परिवहन विभाग अशा विना हेल्मेट दुचाकी वाहकावर कारवाई करेल असे ते म्हणाले.

            यावेळी सभेत नगरपरिषद, जिल्हा व शहर वाहतूक शाखा, पोलीस विभाग यांनी वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी सिग्नल बसविण्यात आल्याची माहिती मोरे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या गावातून येणाऱ्या छोटया रस्त्यावर, शहरात व तालुक्याच्या ठिकाणी गतीरोधक व वाहतुक चिन्ह बसविणे तसेच अवैध गतीरोधक काढून टाकणे, मानोरा तालुकयातील अवैध प्रवाशी वाहतूकीला आळा घालण्यासाठी, जिल्हयात वाशिम ते रिसोड रोडवर वांगी फाटयाजवळ, कानडे इंटरनॅशनल स्कूल शेलु रोड तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य गेट, उपजिल्हा रुग्णालय कारंजा तसेच कामरगांव, मंगरुळपीर, रिसोड, अनसिंग, मानोरा व मालेगांव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य रस्त्यावर गतीरोधक बसविण्याचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती सभेत देऊन यावर चर्चा करण्यात आली. झाशी राणी चौक, कारंजा येथे वाहतूक चिन्ह दर्शविणारा फलक लावण्यात आल्याची माहिती यावेळी सभेत देण्यात आली.





0 Response to "रस्ता सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article