श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे ग्रामीण शिबीर चिखली येथे संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य/
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे ग्रामीण शिबीर चिखली येथे संपन्न
वाशिम - श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथील एम एस डब्ल्यू - भाग एक च्या विद्यार्थ्यांचे क्षेत्रकार्य अंतर्गत पाच दिवसीय ग्रामीण शिबीर चिखली बु येथे नुकतेच संपन्न झाले.
या पाच दिवसीय शिबिरामध्ये गावाची पाहणी, गावाच्या आर्थिक संरचनेचा अभ्यास, कृषी क्षेत्राचा अभ्यास, गावातील सामाजिक व सांस्कृतिक घटकांचा अभ्यास, गावातील वृद्ध व्यक्तीं समवेत चर्चा, स्वच्छता अभियान, रमाई घरकुल सर्वेक्षण, रॅली, पोस्टर सादरीकरण, इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावाचे सरपंच डॉ. सोनम घुगे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक दशरथ राठोड, किसान युवा क्रांती संघटनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष शंकर भारती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा शिंदे, क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा. डॉ. संदीप शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
कु. शिल्पा करवा या विद्यार्थिनीने कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
सूत्रसंचालन कु. पूनम सोनुने हिने तर आभार प्रदर्शन कु. माधुरी गव्हाणकर या विद्यार्थिनीने केले. सदर कार्यक्रमाला पुनम लोंढे, सुष्मिता राऊत, नितीन जुमळे, अभिजीत शामसुंदर, शिवम घोडेकर, सीमा बोरकर, शितल पाईकराव, धम्मपाल कांबळे उपस्थित होते
0 Response to "श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे ग्रामीण शिबीर चिखली येथे संपन्न"
Post a Comment