-->

पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट; महाराष्ट्रासह ८ राज्यांना फटका

पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट; महाराष्ट्रासह ८ राज्यांना फटका


साप्तहिक सागर आदित्य/

पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट; महाराष्ट्रासह ८ राज्यांना फटका

मुंबई : राज्यभरातील हवामानात सतत बदल होत असून, कमाल तापमानाचा पारा चढू लागला आहे. पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. याचा फटका गुजरात, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, राजस्थान, हरयाणा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला बसेल.

 कुठे बरसणार?२४ एप्रिल : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. विदर्भात हवामान कोरडे राहील. २५, २६, २७ एप्रिल : कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील. विदर्भात हवामान कोरडे राहील.

 मुंबई ३७.४ मुंबई सातत्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३७ अंशावर पोहोचला आहे. तापमानात भर पडत असतानाच उकाडादेखील जीव काढत असून, पुढील २४ तास असेच वातावरण राहणार आहे.

0 Response to "पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट; महाराष्ट्रासह ८ राज्यांना फटका"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article