तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर होळीची स्थानिक सुट्टी रद्द
साप्ताहिक सागर आदित्य/
तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर होळीची स्थानिक सुट्टी रद्द
वाशिम, दि. 14 : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १४ मार्च २०२२ च्या एका सुधारीत आदेशाने सन २०२२ या वर्षासाठी स्थानिक तीन सुट्टया जाहीर केल्या आहे. यापूर्वी होळी या सणाची १७ मार्च २०२२ रोजी देण्यात आलेली स्थानिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता ११ ऑगस्ट २०२२ रोजी नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) या दिवसाची स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. २६ ऑगस्ट २०२२ रोजी पोळा आणि २५ ऑक्टोबर २०२२ रोजी लक्ष्मीपूजन नंतरचा दुसरा दिवस अशा एकूण तीन स्थानिक सुट्ट्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी जाहीर केल्या आहे. हे आदेश वाशिम जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष यांना लागू असणार नाही.
0 Response to "तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर होळीची स्थानिक सुट्टी रद्द"
Post a Comment