शासकीय तंत्रनिकेतन येथे मुला/मुलींकरीता मोफत प्रशिक्षणाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य/
शासकीय तंत्रनिकेतन येथे मुला/मुलींकरीता मोफत प्रशिक्षणाचे आयोजन
वाशिम, दि. 14 : केंद्रीय प्रशिक्षण संचालनालय, नवी दिल्ली यांच्याकडून सर्व मुला/ मुलींना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त व्हावा व त्यांचा तांत्रिकदृष्टया सर्वांगीण विकास व्हावा. या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन येथे खालील नमुद केलेले मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. तरी ईच्छुकांनी संपर्क साधुन सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिण्याचा आहे. अभ्यासक्रम 22 मार्च 2022 पासुन सुरु होत आहे. तरी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधुन प्रवेश निश्चीत करावा.
प्रशिक्षण वर्ग पुढिल प्रमाणे आहेत. टु व्हीलर रिपेअर ॲन्ड मेन्टेनन्स, इलेक्ट्रीशयन, या व्यतिरीक्त आवश्यकतेनुसार ग्रामीण भागातील युवक व युवती यांच्या मागणीनुसार विविध प्रशिक्षण देण्यात येईल. सीडीटीपी कार्यालयात शासकीय तंत्रनिकेतन, रिसोड रोड, वाशिम येथे प्रत्यक्ष किंवा 9822976562, 8806382652 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी केले आहे.
0 Response to "शासकीय तंत्रनिकेतन येथे मुला/मुलींकरीता मोफत प्रशिक्षणाचे आयोजन "
Post a Comment