नॅशनल कराटे चॅम्पिअनशिप मध्ये हिंदवी आंबेकरला सुवर्ण पदक
साप्ताहिक सागर आदित्य/
नॅशनल कराटे चॅम्पिअनशिप मध्ये हिंदवी आंबेकरला सुवर्ण पदक
वाशिम - शटोकान कराटे असोशिअन इंडियाच्या वतीने नॅशनल कराटे चॅम्पिअनशिप २०२२ या राष्रीसमय स्तरावरील कराटे स्पर्धेमध्ये १० वर्षाच्या आतील वयोगटामध्ये वाशिम येथील हिंदवी आंबेकर या ७ वर्षाच्या चिमुकलीने सुवर्ण पदक पटकावले आहे.
वाशिम येथील जिल्हा क्रिडा संकुलमध्ये दि. १२ व १३ मार्च रोजी झालेल्या या कराटे स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यातील क्रिडापटुंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वाशिम येथील हिंदवी हिने भाग घेतला होता. हिंदवीने आपले प्रतिस्पर्धी असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक, वाशिम व मध्यप्रदेशमधील खेळाडुंना मात देत तीन्ही राऊंडमध्ये यश संपादन करुन सुवर्ण पदक मिळविले. विद्याभारती शाळेत पहिल्या वर्गात शिकत असलेल्या हिंदवीला प्रशिक्षक निखील देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल हिंदवीचे सर्व नातेवाईक, भावसार युवा एकता, हिंगलाज महिला मंडळ आणि भावसार क्षेत्रीय समाज इ. संघटनांनी अभिनंदन केले आहे.
0 Response to "नॅशनल कराटे चॅम्पिअनशिप मध्ये हिंदवी आंबेकरला सुवर्ण पदक "
Post a Comment