-->

MPSC Exam Postponed: रविवारी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर

MPSC Exam Postponed: रविवारी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर


साप्ताहिक सागर आदित्य/

 MPSC Exam Postponed: रविवारी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर

मुंबई : २ जानेवारी २०२२ रोजी होणारी लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी , तहसीलदार अशा ३९० पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. वाढीव वयोमर्यादेनुसार, जे उमेदवार परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत आणि त्यांनी अर्ज भरलेला नाही असे उमेदवार पूर्व परीक्षेसाठी १ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.


२ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर

यंदापुरत्या दिलेल्या सवलतीच्या वाढीव वयोमर्यादेनुसार १ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार

सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार होती. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. करोना काळात शासकीय सेवांमधील भरतीसाठी परीक्षा न झाल्यामुळे अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. परीक्षेसाठी राज्य सरकारतर्फे अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या वाढीव वयोमर्यादेनुसार, जे उमेदवार परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत आणि त्यांनी अर्ज भरलेला नाही असे उमेदवार पूर्व परीक्षेसाठी १ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.कोविड १९ महामारी संक्रमणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २०२१ या वर्षात होऊ शकली नाही. परिणामी ज्या उमेदवारांची वयोमर्यादेनुसार संधी या वर्षी संपली, त्यांचे नुकसान होत होते. परिणामी राज्य सरकारने या उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील घोषणा नुकतीच केली होती. परिणामी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे.पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी , तहसीलदार अशा ३९० पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. आता वयोमर्यादेनुसार ज्यांची परीक्षा देण्याची संधी २०२१ मध्ये संपत होती, असे उमेदवार या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करू शकणार आहेत. हे अर्ज करण्याची मुदत २८ डिसेंबर ते १ जानेवारी आहे.




0 Response to "MPSC Exam Postponed: रविवारी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article