-->

वाशिम सायकलस्वार व वाशिम रोंदिनर क्लबचा उपक्रम

वाशिम सायकलस्वार व वाशिम रोंदिनर क्लबचा उपक्रम

 




साप्ताहिक सागर आदित्य/

दोनशे किमी ब्रेवेट सायकलस्वारी, ५० वर्षीय महिलांची यशस्वी भरारी

५ महिलांसह महाराष्ट्रातुन ४१ सायकलप्रेमींचा सहभाग

वाशिम सायकलस्वार व वाशिम रोंदिनर क्लबचा उपक्रम

वाशिम : मनुष्याच्या अंगात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणत्याही वयात कोणतेही कार्य अशक्यप्राय नाही. ही बाब कार्यसिध्दीचा संकल्प घेवून सलग २०० किलोमिटर सायकल मोहीमेत यशाचा झेंडा रोवलेल्या ५० वर्षीय महिलांच्या सहभागातून दिसून आली. वाशिम सायकलस्वार ग्रुप व वाशिम रोंदिनर क्लबच्या आयोजनातून ६ डिसेंबर रोजी आयोजीत या मोहीमेत राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या ५ महिलांसह तब्बल ४१ सायकलप्रेमींनी सहभाग घेवून निर्धारीत वेळेत २०० किमीचे अंतर पुर्ण करुन ही मोहीम अजरामर केली.

  स्थानिक पाटणी चौक येथे सकाळी ५ वाजता मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. मोहीमेला ठाणेदार निवृत्ती बोर्‍हाडे यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर सायकलस्वारांनी वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, खेर्डा, धनज व परत त्याच मार्गाने वाशिम असे २०० किलोमिटरचे अंतर सलग सायकल चालवत निर्धारीत वेळेत पूर्ण केले.

  या मोहीमेत लियाकत हुसेन, विशाल इहारे, जितेश कोषातवर, अतुल माइंडे, प्रफुल भूपता, सुरेश भूसंगे, हर्षल झोपाटे यवतमाळ, कृष्णा सोडगिर घाटंजी, सदानंद देशमूख दिग्रस, युसूफ शेख, विशाल ठाकूर, नारायण ढोबळे, विवेक बोरकर, प्रशांत बक्षी वाशिम, विनोदसिंग चौहान, प्रशांत आघाव, देव भोजे, अंजली देशमुख, अमिता देशपांडे, श्रीराम देशपांडे, सागर धानोदकर, संग्राम धोटे, विजय धुर्वे, अतुल दिवाण, अर्चना दुधे, आशिष गौरशेतीवार, अर्णव हिवरले, नरेंद्र कुरलकर, अर्चना मंगे, महेश मानवर, महेश मेश्राम, राधा राजा, हर्ष राठी, विनोद वानखेडे, ऋषिकेश इंगोले, विवेक इंगोले, प्रवीण कंडपासोले, पंकज सरकटे अमरावती असे सायकलप्रेमी सहभागी झाले होते. मोहीमेच्या यशस्वीतेसाठी, नीरज चारोळे, दिनेश इंगोले, चेतन शर्मा यांनी अथक परिश्रम घेतले.

0 Response to "वाशिम सायकलस्वार व वाशिम रोंदिनर क्लबचा उपक्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article