-->

मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक; नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता

मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक; नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता


साप्ताहिक सागर आदित्य/

मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक; नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या (Covid-19) वाढत असल्याचं दिसून येत आहे. एका दिवसात कोरोना रुग्ण दुपटीनं वाढल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

 राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या (Covid-19) वाढत असल्याचं दिसून येत आहे. एका दिवसात कोरोना रुग्ण दुपटीनं वाढल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. रुग्णवाढ झपाट्यानं होत असल्यानं राज्यात पुन्हा काही कठोर निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीनं कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध वाढविण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज दुपारी होणारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक देखील मुख्यमंत्र्यांनी रद्द केली आहे. राज्य सरकारनं आता पूर्णपणे कोरोना रुग्णवाढीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.राज्यात काल ३९०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात २५१० रुग्ण तर एकट्या मुंबईतून आढळले आहेत. तसंच ओमायक्रॉनचे देशातील सर्वात जास्त रुग्ण दिल्लीनंतर महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात ओमायक्रॉनमुळे होऊ शकते असं मत देखील तज्ज्ञांनी याआधीच व्यक्त केलं आहे. दिल्लीत ओमायक्रॉनचे २६३ तर महाराष्ट्रात २५२ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षाही अधिक वेगानं ओमायक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार होतो. त्यामुळे कमीत कमी कालावधीत कोरोना पुन्हा एकदा थैमान घालू शकतो याचा अंदाज घेत सरकार सतर्क झालं आहे. मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदीमुंबईमध्ये जमावबंदी लागू केल्यानंतर आता जमावबंदी आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या जागांमध्ये किंवा बंदिस्त जागांमध्ये पार्टीचं अथवा कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी घालण्यात आली आहे. ३० डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधील, रेस्तराँ, हॉटेल्स, ओपन स्पेस किंवा बंदिस्त जागांमध्ये नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचं किंवा पार्टींचं आयोजन करता येणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

कोविड केंद्रे सुरू करण्याची तयारी 

कोविड रुग्णांची संख्या दोनशेवरुन आता दोन हजारांवर पोहोचल्याने महापालिकेने पाच जम्बो कोविड केंद्र सुरु करण्याची तयारी केली आहे. या केंद्रांची देखभाल व वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका संबंधित वैद्यकीय संस्थेला १०५ कोटी रुपये देणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी अथवा जोपर्यंत कोविडचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत या केंद्रांची जबाबदारी संबंधित खासगी वैद्यकीय संस्थेकडे असणार आहे.




0 Response to "मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक; नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article